मुंबई | अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा फेक व्हीडीओ व्हायरल झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. व्हायरल होणाऱ्या या व्हीडीओबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांनी देखील घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करत यावर कायदेशिर कारवाई करता येऊ शकते असे म्हणटले. खाली ओरिजनल आणि फेक दोन्ही व्हीडीओ दिलेले आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल हे किती भयंकर आहे.
रश्मिकाच्या व्हायरल होणाऱ्या व्हीडीओवर चाहत्यांनी देखील रश्मिकाला कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर रश्मिका मंदाना हिचा ‘तो’ फेक व्हिडीओ अद्यापही तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
Rashmika Mandanna Deepfake Video
या फेक व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना हिने पहिल्यांदाच भाष्य केले. रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट म्हटले की, हे शेअर केल्यानंतर मी खरोखरच खूप जास्त दुखावले गेले आहे. माझ्याबद्दलचा एक डीपनेक व्हिडीओ आॅनलाईन व्हायरल केला जातोय.
मला आता त्यावर बोलायचे आहे. हे फक्त माझ्यासाठीच नाहीये. तंत्रज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जातोय आणि हे आपल्यापैकी प्रत्येकासाठीच खूप जास्त भीतीदायक आहे. मी आज एक महिला आणि अभिनेत्री आहे म्हणून माझे कुटुंबिय, मित्र आणि माझे सर्व हितचिंतक माझ्यासोबत आहेत आणि माझे संरक्षण करत आहे. परंतू जर मी काॅलेज आणि शाळेमध्ये असते आणि माझ्यासोबत त्यावेळी असे घडले असते तर मी कदाचित या गोष्टी हाताळू देखील शकले नसते.
मी खरोखरच याबद्दल कल्पना देखील अजिबातच करू शकत नाही. आपल्यापैकी अधिक लोकांना अशा चोरीचा परिणाम होण्याआधी एक समुदाय म्हणून तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.