Thursday, June 8, 2023
HomeNewsRajaram Sakhar Karkhana Result Update | राजाराम कारखाना संस्था गटातून महादेवराव महाडिकांची...

Rajaram Sakhar Karkhana Result Update | राजाराम कारखाना संस्था गटातून महादेवराव महाडिकांची विजयी सलामी

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने विजयाचे खाते खोलले आहे. दुसऱ्या फेरीत संस्था गटातून महादेवराव महाडिक 39 मतांनी विजयी झाले आहेत.

कोल्हापूर | अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने 9 पैकी 6 गटात विजय मिळवला आहे. त्यामुळे महाडिक गट सत्ता कायम राखणार हे निश्चित आहे. (Rajaram Sakhar Karkhana Result Update)

पहिली विजयी सलामी महादेवराव महाडिक यांनी दिली. दुसऱ्या फेरीत संस्था गटातून महादेवराव महाडिक 39 मतांनी विजयी झालेत. संस्था गटात 129 पैकी 128 मतदारांनी मतदान केले होते. त्यातील महाडिक यांना 83 इतकी मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पाटील (वसगडे, ता करवीर) यांना 44 मते मिळाली आहेत. (Rajaram Sakhar Karkhana Result Update)


कोल्हापूर | अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणूकीत सत्ताधारी महाडिक गट आघाडीवर असल्याचे दिसत आहे. (Rajaram Sakhar Karkhana Result Update)

सत्ताधारी गटाचे 21पैकी 11 उमेदवार आघाडीवर आहेत. राजाराम कारखाना निवडणूकीची एकूण दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी अद्याप सुरु आहे. गट क्रमांक एक, दोन, तीन आणि चारची मतमोजणी झाली असून यामध्ये महाडिक पॅनलचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत

25 Apr 2023, 01:23 PM वाजता : सत्ताधारी महाडिक गटाचे आघाडीवर असणारे उमेदवार

1) भोसले विजय वसंत 
2) मगदूम संजय बाळगोंडा
3)  शिवाजी रामा पाटील
4) सर्जेराव बाबुराव भंडारे
5) अमल महादेवराव महाडिक
6) विलास यशवंत जाधव
7)  डॉ.मारुती भाऊसो किडगावकर
8)  सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)
9) तानाजी कृष्णात पाटील
10) दिलीप भगवान पाटील 
11)  मीनाक्षी भास्कर पाटील

25 Apr 2023, 12:49 वाजता : पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर

तिसऱ्या गटात साधारण 900 ते 1000 मतांची आघाडी

गट क्रमांक 3 :
सतेज पाटील पॅनल

  1. गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) – 2158
  2. पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर ) – 2068
  3. माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) – 2361

महाडिक पॅनेल

  1. डॉ. किडगावकर मारुती भाऊसो – 3129
  2. जाधव विलास यशवंत – 2934
  3. पाटील सर्जेराव कृष्णा – 3051

25 Apr 2023, 11:49 वाजता : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी निकाल अपडेट. व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र 2 पहिली फेरी – महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर.

सतेज पाटील पॅनल  

  1. किबिले शिवाजी ज्ञानू – 2271
  2. पाटील दिलीप गणपतराव – 2317
  3. माने अभिजित सर्जेराव – 2168

महाडिक पॅनल 

  1. शिवाजी रामा पाटील – 3202
  2. सर्जेराव बाबुराव भंडारे – 3184
  3. अमल महादेवराव महाडिक – 3303

गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदान

25 Apr 2023, 11:12 वाजता – पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडीवर  

सतेज पाटील पॅनल

  1. बेनाडे शालन बाबुराव- 2441 मते
  2. भोसले किरण बाबासो-2413

महाडिक पॅनल

  1. भोसले विजय वसंत -3244
  2. मगदूम संजय बाळगोंडा-3169

सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही नेत्यांची या कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झाले असून दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत.

मतमोजणी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरु आहे. दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होत असून पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. संस्था गटातील मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular