News

Rain Update 9 July 2024 : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; कोल्हापूरातील 51 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर | गेल्या चोवीस तासांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. प्रामुख्याने मुंबईसह कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात देखील मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने केरळ, कर्नाटक, कोकण, गोवा, गुजरात या किनारपट्टीला सतत रेड अलर्ट देण्यात येत आहे. आगामी 24 तास पुन्हा या संपूर्ण किनारपट्टीला पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली:
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वारणा नदीवरील- चिंचोली, भोगावती नदीवरील- शिंरगाव,हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली व बाजारभोगाव, घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली, कोवाड व उमगाव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व सिध्दनेर्ली, तुळशी नदीवरील -बीड, धामणी नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, कुंभी नदीवरील- कळे व शेनवडे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे 51 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
राधानगरी 3.97 टीएमसी, तुळशी 1.75 टीएमसी, वारणा 17.29 टीएमसी, दूधगंगा 8.66 टीएमसी, कासारी 1.25 टीएमसी, कडवी 1.69 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.37 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 1.06 टीएमसी, जंगमहट्टी 0.97 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.00 टीएमसी, सर्फनाला 0.27 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम 32.11 फूट, सुर्वे 31.7 फूट, रुई 61.6 फूट, इचलकरंजी 57.6 फूट, तेरवाड 49.6 फूट, शिरोळ 40.6 फूट, नृसिंहवाडी 37 फूट, राजापूर 27.1 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 13.10 फूट अशी आहे.

Back to top button