Career
रेल्वे भरती 2025: 1036 विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी | Railway Naukri 2025
रेल्वे बोर्डाने विविध पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत ही भरती होणार असून, यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्रायमरी रेल्वे शिक्षक (PRT) यांसारख्या 1036 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 7 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 फेब्रुवारी 2025
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. अधिकृत वेबसाईट rrbmumbai.gov.in वर अर्ज करता येईल.
भरतीसाठी आवश्यक पात्रता
- शैक्षणिक पात्रता:
- किमान 12वी उत्तीर्ण.
- संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
- शिक्षक पदांसाठी B.Ed., D.El.Ed., किंवा TET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक.
- वयोमर्यादा: 18 ते 48 वर्षे.
परीक्षा शुल्क
- सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्ग: ₹500/-
- SC/ST/महिला/माजी सैनिक/PwD प्रवर्ग: ₹250/-
सर्व शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे.
विशेष सूचना: परीक्षेच्या अंतिम टप्प्यानंतर शुल्क परत मिळेल.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 187 |
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 338 |
प्रायमरी रेल्वे शिक्षक (PRT) | 188 |
कनिष्ठ हिंदी अनुवादक | 130 |
मुख्य कायदा सहाय्यक | 54 |
सरकारी वकील | 20 |
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक | 18 |
लायब्ररियन | 10 |
संगीत शिक्षक (महिला) | 3 |
इतर पदे | 88 |
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात होणार आहे. उमेदवारांनी भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी आणि पदांच्या शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी. रेल्वेतील नोकरीची संधी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी गमावू नका!
Important Links For RRB Ministerial & Isolated Categories Recruitment 2024-25 | |
PDF जाहिरात | Railway Naukri 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | Railway Naukri Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |