रायगड | ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन महारोजगार मेळावा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि विविध शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची (Raigad Job Fair) ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 1417 जागांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून 24 जुन 2023 रोजी सदर मेळावा पार पडणार आहे.
या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून हेल्पर, डेटा एंट्री ऑपरेटर, डेव्हलपमेंट मॅनेजर, बिझनेस पार्टनर, फॅकल्टी/ट्रेनर, डेव्हलपमेंट मॅनेजर, टूल अँड डाय मेकर/इलेक्ट्रीशियन/प्रेस ऑपरेटर/फिटर/वेल्डर/मदतनीस, बरामदरे, टीमर, टीम ऑफिस एक्झिक्युटिव्ह, ऑपरेटर, सहयोगी, होस्टेस, सहयोगी, कर्तव्य व्यवस्थापक, पर्यवेक्षक, SR. सहयोगी, ड्रायव्हर, एक्झिक्युटिव्ह, पूल अटेंडंट, कंट्रोलर, अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सीनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि विविध पदे भरली जाणार आहेत. (Raigad Job Fair)
यासाठी 10वी, 12वी, ITI, Diploma, Degree धारण केलेले उमेदवार पात्र असून इच्छूकांनी पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे महात्मा फुले सभागृह ता.पनवेल या पत्यावर मेळाव्यासाठी उपस्थित राहावे. तत्पूर्वी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी शासनाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच या मेळाव्यातील पदभरतीच्या अधिक माहितीसाठी Raigad Rojgar Melawa या लिंकवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी.