News

Radhanagari Dam : अखेर बारा दिवसांनी राधानगरीचे सर्व दरवाजे बंद

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी कमी होत नव्हती. परंतु आता पावसाचा जोर ओसरला आहे. तसेच धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग देखील कमी झाल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर ओसरल्याने 25 जुलैपासून सुरू असणारे राधानगरी धरणाचे 6 आणि 7 क्रमांकाचे दोन दरवाजे अखेर तब्बल बारा दिवसानंतर बंद झालेत. आज (सोमवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दहा वाजून एक मिनिटांनी क्रमांक 6 चा तर पाठोपाठ दहा वाजून दोन मिनिटांनी क्रमांक 7चा स्वयंचलित दरवाजा बंद झाला.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राधानगरी धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे 7 स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. पावसाचा जोर ओसरेल तसे 5 दरवाजे बंद झाले. अखेर आज उर्वरित दोनही दरवाजे बंद झाले. आता धरणातून केवळ पॉवर हाऊससाठी 1500 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

दि. 05/08/2024
सकाळी 11:00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
40’05\”
(542.51 m )
विसर्ग 60106 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
*एकुण पाण्याखाली बंधारे – 58

Back to top button