उर्फी जावेदला तात्काळ बेड्या ठोका! चित्रा वाघ यांची पोलिसांकडे तक्रार; उर्फीच्या अडचणी वाढणार | Urfi Javed

मुंबई | फॅशनच्या नावाखाली चित्रविचित्र ड्रेस परिधान करणाऱ्या उर्फी जावेद(Urfi Javed) ला तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. उर्फी तिच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे चर्चेत असते. अतरंगी फोटोशूट करून ती सोशल मीडियावर पोस्ट करते. अनेक वेळा यामुळे तिला ट्रोल केलं जातं, तर काही जण तिचं कौतुकही करतात.

उर्फीने नुकतचं एक फोटोशूट शेअर केलं असून यावरूनच चित्रा वाघ संतापल्या असून त्यांनी मुंबई पोलिसांना ट्विट करत उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. 

चित्रा वाघ यांचे ट्वीट

‘शी…ऽऽऽऽ अरे.. हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हिला..
एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं ट्वीट चित्र वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

चित्रा वाघ यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘बरोबर ताई अशा मुलींना काही वाटत की, नाही आम्हाला बघायला पण लाज वाटत आहे. ही रस्त्यावर उभी आहे.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘या बाईला रोखायला हवं पण त्याच्या पेक्षा हिच्या फॅशन डिझायनर वर कठोर कारवाई करायची गरज आहे.’

उर्फी जावेदचे हे फोटोशूट पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल

उर्फी जावेद आहे तरी कोण? 

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. तसेच उर्फीने ‘ऐ मेरे हमसफर, जीजी मां, मेरी दुर्गा, बेपनाह, चंद्र नंदिनी या शोमध्ये काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. सध्या अभिनय क्षेत्रापेक्षा उर्फी सोशल मिडीयावर जास्त सक्रीय आहे.तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे वेगवेगळे लूक हे चर्चेत असतात.