‘पुष्पा 2 : द रूल’ या दिवशी येणार भेटीला, निर्मात्यांनी सिनेमाच्या क्लायमॅक्स संदर्भात दिली अपडेट, पहा व्हीडीओ | Pushpa 2
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा 2 द रुल’बाबतची (Pushpa 2) चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीजची तारीख जाहीर केली असून सध्या क्लायमॅक्सचे शुटींग युध्दुपातळीवर सूरू आहे.
यापूर्वी पुष्पा 2 ऑगस्ट मध्ये रिलीज करण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित झाली असून जगभरात एकाच तारखेला हा पुष्पा रिलीज केला जाणार आहे.
चित्रपटाच्या रिलीजबाबत तर्कवितर्क लावले जात असताना, निर्मात्यांनी मात्र या चित्रपटाचे शूटिंग युद्धपातळीवर सुरू ठेवले होते. आता या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू असून, मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादच्या सेटवर हाय-ऑक्टेन ॲक्शन सीन करताना दिसून आला आहे.
निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की \’पुष्पा २ द रुल\’ हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, जगभरातील साऊथ चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कलाकार आणि कर्मचारी:
या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहद फासिल, अनुसया भारद्वाज, सुनील, राव रमेश, जगदीश आणि इतर अनेक प्रभावी कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. देवी श्री प्रसाद यांचे संगीत दिग्दर्शन असलेला हा चित्रपट मैत्री मुव्ही मेकर्सद्वारे निर्मित आहे.
पुष्पा द राइजची यशोगाथा:
2021 मध्ये रिलीज झालेला \’पुष्पा द राइज\’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 360 ते 373 कोटी रुपयांची कमाई करून सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर \’पुष्पा २\’ची उत्सुकता अधिकच वाढली होती. आता रिलीजची तारीख जाहीर झाल्याने चाहत्यांचा उत्साह दुणावला आहे.