Saturday, September 23, 2023
HomeCareerसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 133 सहायक प्राध्यापकांची भरती, त्वरित अर्ज करा |...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 133 सहायक प्राध्यापकांची भरती, त्वरित अर्ज करा | Pune University Bharti 2023

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिक्त जागांसाठी भरती (Pune University Bharti 2023) केली जाणार आहे. प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यामुळे विद्यापीठाने 133 जागांवर सहायक प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने सहायक प्राध्यापकांच्या 133 जागांवर कंत्राटी नियुक्तीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान, आंतविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील चाळीस शैक्षणिक विभागांतील जागांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. (Pune University Bharti 2023)

या पदांसाठी दरमहा 40 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती 31मे 2024 पर्यंत असेल. या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जुलै आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत आरक्षणनिहाय जागा, पात्रता, नियम-अटी याबाबतच्या सूचना माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

PDF जाहिरात – Pune University Recruitment 2023 (Teaching Post)

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जवळपास 55 टक्के जागा रिक्त आहेत. शासनाकडून प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होतो. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या विविध क्रमवारीतील विद्यापीठाच्या स्थानावरही त्याचा परिणाम दिसून आला आहे.

गेल्यावर्षीही विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली होती. आता यंदाही पुन्हा ही प्रक्रिया राबवली जात आहे. कंत्राटी भरतीमुळे विद्यापीठ निधीवर ताण निर्माण होत आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “डीन आणि संचालक” पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

 PDF जाहिरात Pune University Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज कराPune University Recruitment Online

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular