Tuesday, September 26, 2023
HomeCareerपुणे महापालिकेत 400 सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त | Pune Mahanagarpalika Recruitment 2023

पुणे महापालिकेत 400 सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त | Pune Mahanagarpalika Recruitment 2023

पुणे | पुणे महापालिकेत 2010 सालापासून कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची भरती (Pune Mahanagarpalika Recruitment 2023) झालेली नाही. त्यामुळे कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांच्या तब्बल 400 जागा रिक्त आहेत. त्याशिवाय पालिकेच्या विविध आस्थापनांची सुरक्षा पाहण्यासाठी 800 खासगी सुरक्षारक्षकांची गरज आहे.

सुरक्षा रक्षकांची भरतीच न झाल्याने पालिकेच्या विविध आस्थापनांवर सुरक्षारक्षकच नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर आहे. महापालिके अंतर्गत येणारी मुख्य इमारत, शाळा, उद्याने, नाट्यगृहे, क्षेत्रीय कार्यालये, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव, ॲमिनेटी स्पेसच्या यांसारख्या सुमारे 500 आस्थापना सुरक्षा रक्षकांविना आहेत.

सध्या पुणे महापालिकेत खासगी सुरक्षारक्षकांची संख्या 1 हजार 640, तर कायमस्वरूपी 320, अशी एकूण 1 हजार 960 इतकी आहे. पालिकेच्या आस्थापनांची संख्या विचारत घेता सुरक्षारक्षकांची ही संख्या अपुरी आहे.

महापालिकेत गेल्या कित्येक वर्षात सुरक्षारक्षकांची भरतीच न झाल्याने कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे पुणे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले आहे. यामुळे महापालिकेत सुरक्षारक्षकांची पदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular