पुणे महानगरपालिका अंतर्गत ४५ रिक्त पदांसाठी भरती; थेट मुलाखतीद्वारे निवड | Pune Mahanagarpalika Recruitment

पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्यूटर“ पदाच्या 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत घेण्यात येणार आहेत.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्यूटर
 • पदसंख्या – 45 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे
 • मुलाखतीणीची तारीख – 02 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत 
 • अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3VHSPfB
 • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • दिनांक २/९/२०२३ पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत Walk-in- Interview या पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
 • वर नमूद केलेल्या पद संख्येत व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
 • वरील पदासाठीची सविस्तर माहिती प्रशासकीय कार्यालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे उपलब्ध होईल. तरी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक नियमांनुसार पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) दि.०२/०१/२०२३ पासून वॉक इन मुलाखतीसाठी मूळ कागद पत्रे व साक्षाकित प्रती (एक संच) सहीत उपस्थित राहावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.