Tuesday, October 3, 2023
HomeCareerपुणे येथे विविध कंपन्यात 10 वी, 12 वी, ITI सह विविध पदवीधरांना...

पुणे येथे विविध कंपन्यात 10 वी, 12 वी, ITI सह विविध पदवीधरांना नोकरीची संधी; 5480 रिक्त जागा | Pune Jobs

पुुणे | नोकरीच्या शोधात पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यामध्ये विविध शाखेतील तरूणांचा समावेश असतो. हीच बाब ध्यानात घेत राज्य शासनाच्या वतीने पुणे येथे (Pune Job Fair 2023) नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी सातत्याने रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. 31 जुलै 2023 रोजी याच कारणास्तव ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune Job – येथे ‘प्रशिक्षणार्थी, टूल अँड डाय मेकर / फिटर / वेल्डर / हेल्पर, ऑपरेटर, सीएसए/हेल्पर/हाऊस कीपर, सेल्स एक्झिक्युटिव्ह / अकाउंटंट/साइट पर्यवेक्षक/सेल्स कोऑर्डिनेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन पर्यवेक्षक / सेल्स एक्झिक्युटिव्ह / बॅक ऑफिस’ यासारख्या विविध पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी. (Pune Job Fair 2023)

या मेळाव्याला 10वी, 12वी, ITI, Degree, Diploma, पदवीधर उमेदवार उपस्थित राहू शकतात. सदर मेळावा जेजुरी पालखी तळ, ​ता. पुरंदर , जि . पुणे ​येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी इच्छूक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचे आणि उपलब्ध असतील तर अनुभवाचे कागदपत्र सोबत आणावे.

PDF जाहिरात Pune Job Fair 2023
नोंदणी करा – rojgar.mahaswayam.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular