पुणे | पुणे येथे विविध IT कंपन्या तसेच विविध औद्योगिक कंपन्यांच्या माध्यमातून रिक्त पदांच्या तब्बल 3000 जागांची भरती (Pune Job 2023) केली जाणार आहे. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
Pune Job 2023 –
मेळाव्याचा पत्ता – सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस भवन, 1065 बी, चथुरशिंगी रोड, मॉडेल कॉलनी.
शैक्षणिक पात्रता – M.C.A., M.Sc., Graduate in Engineering(B.E./B.Tech.)
तसेच 10वी, 12वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार या मेळाव्यासाठी हजर राहू शकतात.
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून 3 हजारापेक्षा अधिक रिक्त पदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.
नोकरीस इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जाहिरात – Pune IT Job 2023
नोंदणी – Pune IT Recruitment