Saturday, September 23, 2023
HomeCareerपुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिक्षक, लिपिकसह इतर विविध 125 रिक्त पदांची होणार...

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिक्षक, लिपिकसह इतर विविध 125 रिक्त पदांची होणार मुलाखतीद्वारे भरती | Pune District Education Association Recruitment

पुणे | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना पुणे शिक्षण मंडळ अंतर्गत नोकरीची चांगली संधी प्राप्त झाली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 125 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Pune District Education Association Recruitment)

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत ” प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल/ लिपिक” पदांच्या 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या  उमेदवारांच्या मुलाखती योजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 जुन 2023 आहे. (Pune District Education Association Recruitment)

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत 26 जुन 2023 रोजी घेण्यात येईल. सकाळी 11 वाजता उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – 1https://shorturl.at/cer25
PDF जाहिरात – 2https:/shorturl.at/pDWZ6
अधिकृत वेबसाईट – pdeapune.org

  • मुलाखतीचा पत्ता –
    • सहाय्यक प्राध्यापक (C.H.B) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मुख्य कार्यालय
    • इतर पदांकरिता –  पुणे जिल्हा शिक्षण संघटनेचे विधी महाविद्यालय, (ए.एम. कॉलेज परिसर) हडपसर, पुणे-411028

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular