Tuesday, October 3, 2023
HomeCareer12वी उत्तीर्णांसाठी पुणे अंगणवाडी भरती; 818 रिक्त जागा | Pune Anganwadi Bharti...

12वी उत्तीर्णांसाठी पुणे अंगणवाडी भरती; 818 रिक्त जागा | Pune Anganwadi Bharti 2023

पुणे | पुणे जिल्हा परिषद अंतर्गत (पुणे अंगणवाडी भरती 2023) अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका” पदांच्या एकूण 818 रिक्त जागा (Pune Anganwadi Bharti 2023) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील संबंधित पत्त्यावर सादर करावे.

 • पदाचे नाव – अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका
 • पदसंख्या – 818 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
 • अधिकृत वेबसाईट – zppune.org
पदाचे नावपद संख्या 
अंगणवाडी सेविका134 पदे
अंगणवाडी मदतनीस653 पदे
मिनी अंगणवाडी सेविका31 पदे
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका/ मिनी अंगणवाडी सेविकाकिमान 12 वी उत्तीर्ण
अंगणवाडी मदतनीसकिमान 12 वी उत्तीर्ण
 • स्थानिक रहिवाशी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचेकडील रहिवासी दाखला
 • अपत्याबाबत (लहान कुटुंब) असलेबाबत स्वयंघोषणापत्र दाखला
 • नांवा बाबत प्रतिज्ञापत्र (मा. तहसिलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत
 • शाळा सोडलेचा दाखला / प्रमाणपत्र (साक्षांकित प्रत.)
 • उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असलेस मा. उपविभागीय अधिकारी सो. यांचेकडील जातीचा दाखला. (साक्षांकित प्रत ) (अ.जा./अ.ज./वि.भ.जा/भ. ज. / इ.मा.व./वि.मा.प्र./आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग)
 • आधार कार्ड, (साक्षांकित प्रत )
 • रेशनिंग कार्ड, (साक्षांकित प्रत)
 • विधवा असलेस पतीच्या मृत्युचा दाखला व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे स्वाक्षरीचा दाखला /
 • अनाथ असलेस संबंधित संस्थेचा दाखला.
 • नियमित अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मिनी सेविका / मदतनीस म्हणुन कमीत कमी 02 वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचेकडील अनुभवाचा दाखला.
 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.
 • सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या व दाखला यांच्या छायांकित प्रति ( झेरॉक्स) A-4 साईज मध्येच असाव्यात A- 4 पेक्षा लहान अथवा मोठया पेपर वरील असु नयेत.
 • खाडाखोड किंवा चुकिचे भरलेले अर्ज बाद केले जातील याबाबत संबंधित अर्जदारांस कोणतीही पुर्व सुचना कार्यालयामार्फत दिली जाणार नाही.
 • अर्जासोबत जोडलेल्या साक्षांकित प्रति, किंवा अन्य कागदपत्रे कोणत्याही परिस्थीतीत उमेदवारांस परत केली जाणार नाहीत.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
 • विहित मुदतीनंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular