राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा कोल्हापूर दौरा रद्द | President Droupadi Murmu
कोल्हापूर | कोल्हापुरातील महापूराच्या स्थिती मुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा रविवारचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा रविवार, दि. 28 जुलै 2024 रोजी श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार होता. सध्या सुरू असलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीमुळे सदरचा महाराष्ट्र कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून हाच कार्यक्रम सप्टेंबर 2024 मध्ये संपन्न होणार आहे.
राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त शहर तसेच जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल; काही मार्ग पूर्णत: बंद तर काही सुरू, जाणून घ्या सविस्तर | President Droupadi Murmu
कोल्हापूर | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्ह्यातील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबतचा वाहतुक नियमन आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये दिनांक 28 जुलै 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जिल्हा दौरा होणार आहे. राष्ट्रपतींचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन ते श्री अंबाबाई दर्शन – सर्कीट हाऊस – ताराराणी चौक – तावडे हॉटेल – वारणानगर कोडोली – परत कोल्हापूर विमानतळ असे मार्गक्रमण राहणार आहे.
यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपतींच्या दौरा मार्गावर मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्याकरिता व नागरिक, पादचारी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता वन वे मार्ग शिथिल करणे, आवश्यकतेनुसार वाहतुक सुरु-बंद करणे अगर वळविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 (1) अन्वये वाहतुक नियमन निर्देश व आदेश जारी केले आहेत.
खालील वन वे मार्ग हे राष्ट्रपती यांचा कॉनव्हॉय ये-जा करण्याच्या कालावधीकरीता व्हि. व्हि.आय. पी. यांचा कॉन्व्हॉय आणि बंदोबस्तातील शासकीय वाहने यांच्याकरीता शिथिल करण्यात येत आहेत.
– दुर्गा सिग्नल चौक ते खाँसाब पुतळा चौक
– खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी
– बिनखांबी ते खरी कॉर्नर
– मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर
वळविण्यात आलेले मार्ग –
– बोरपाडळे हॉटेल येथुन कोडोली, वारणेच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतुक कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात येईल.
– शहापुर माले फाटा येथुन वारणेच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही माले गावाकडे किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल.
– कोडोली पोलीस ठाण्यासमोरील पोखले फाटा येथे वारणेच्या दिशेने कोणत्याही प्रकारची वाहतुक सोडली जाणार
नाही. त्यांना पोखले गावाकडे वळविले जाईल. किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल.
– प्लामाक फाटा कोडोली येथुन एकही वाहन वारणा कोडोलीच्या दिशेने सोडले जाणार नाही.
– वारणा तालीम येथील बॅरीकेटींग पासुन एकही वाहन पुढे सोडले जाणार नाही.
– माले गावातुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.
– दानेवाडी फाटा येथुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.
– म्हसोबा देवालय येथुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.
बंद करण्यात येणारा महामार्ग
राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय विमानतळ येथुन महालक्ष्मीकडे रवाना होताना एचएसपी ऑफिस समोर पुण्याच्या दिशेने जाणारी आणि अथायु हॉस्पिटलच्या समोर कागलच्या दिशेने जाणारी पुणे बेंगलोर एनएच- 4 महामार्गाची वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल.
राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय सर्कीट हाऊस येथुन तावडे हॉटेल मार्गे वाठार ब्रिज येथुन वारणा नगर करीता रवाना होताना लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस, हॉटेल स्टायलँड, उंचगांव रेल्वचे ब्रिज येथे काही काळ पुणे-बेंगलोर एनएच-4 महामार्गाची पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-4 महामार्गावरील कागलकडे जाणारी वाहतुक ही किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा समोर काही काळ अडविली जाईल.
राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय वारणानगर वाठार ब्रिज मार्गे विमानतळाकडे जाताना पुणे-बेंगलोर एनएच-४ हायवेवरील कागलच्या दिशेने जाणारी वाहतुक किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा, नागाव फाटा, सांगली फाटा ओव्हर ब्रिज, पंचगंगा ब्रिज येथे काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्ग वरील पुण्याकडे जाणारी वाहतुक ही लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस समोर काही काळ अडविली जाईल.
राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय वारणानगरकडे जाताना आणि वारणानगरकडुन विमानतळकडे येताना यादरम्यान पुणे बेंगलोर, एनएच-४ हायवेवर असणा-या सर्व वाहनांनी महामार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा. या वाहनांना महामार्गावरुन पर्यायी मार्गाकडे वळविण्यात येईल.
वारणानगर येथील कार्यक्रमाकरीता येणाऱ्या नागरिकांकरीता पार्किंगची सोय
वारणानगर येथे होणा-या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अड्डा येथे पार्कींगची सोय करण्यात आली
आहे. या पार्कीगकरीता येणारी वाहने दिनांक 28 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजण्यापुर्वीच येतील. 10 वाजेनंतर वाठार ते वारणानगर आणि कोडोली ते वारणानगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. कोडोलीकडुन कार्यक्रमाकरीता येणारी वाहने श्रीराम मंदिर, भारत गॅस कडुन गाडी अड्डयाकडे पार्कीग करीता येतील. वारणा तालीम समोरील बॅरीकेटींग पासुन कोणतेही वाहन पुढे येणार नाही.
इतर – राष्ट्रपती महोदयांचा कॉनव्हॉय विमानतळ ते श्री अंबाबाई मंदिर ते सर्किट हाऊस ते वारणानगर ते विमानतळ या दरम्यान येताना आणि जाताना संपुर्ण कॉनव्हॉय मार्गावर महोदयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आवश्यकतेनुसार वाहतुक चालु बंद करण्यात येईल.
नो पार्किंग झोन
राष्ट्रपती महोदयांचा व्हिव्हिआयपी दौरा सुरु होऊन संपेपर्यंत खालील मार्गांवर कोणतेही वाहन पार्क करण्यास मनाई आहे. हा संपुर्ण रस्ता नमुद कालावधीकरता नो पार्किंग झोन म्हणुन जाहीर करण्यात येणार आहे.
- विमानतळ ते शाहु टोल नाका
- शाहु टोल नाका ते केएसबीपी चौक ते ताराराणी चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)
- ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)
- धैर्यप्रसाद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)
- जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते दसरा चौक ते बिंदु चौक
- बिंदु चौक ते मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते श्री अंबाबाई मंदिर
- धैर्यप्रसाद चौक ते सर्किट हाऊस
- ताराराणी चौक ते तावडे हॉटेल
हे निर्देश दिनांक 28 जुलै रोजी व्हिव्हिआयपी दौरा सुरु होवुन संपेपर्यंत फक्त कॉनव्हॉयमधील वाहनांकरीता ये-जा करण्याच्या कालावधीत एकेरी मार्ग शिथिल करण्यात येत आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार महामार्गावरील वाहतुक तसेच कोल्हापूर शहरातील इतर रस्ते, चौक याठिकाणची वाहतुक सुरु बंद करणे अगर वाहतुक वळविण्यात येत आहे, असेही या अधिसुचनेत नमुद आहे.