कोल्हापूर | कोल्हापूर डाक विभाग (Postal Department Recruitment) अंतर्गत “विमा प्रतिनिधी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – विमा प्रतिनिधी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003
- मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
- PDF जाहिरात – http://bit.ly/3klvlzT
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विमा प्रतिनिधी | शैक्षणिक पात्रता: उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. अनुभव: इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे. |
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
- या भरतीकरिता मुलाखत 31 जानेवारी 2023 रोजी खाली दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येत आहेत.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेला सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत मुलाखतीच्या नमूद केलेल्या ठिकाणी प्रत्यक्षपणे अहवाल देणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.