मुंबई | भारतीय टपाल खाते त्यांच्या वेगवेगळ्या सर्कलसाठी वारंवार मोठ्या प्रमाणात भरती करते. नुकतेच भारतीय टपाल खात्याने ग्रामीण डाकसेवक पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. (Post Office Recruitment 2023) या पदभरतीअंतर्गत संपूर्ण भारतातील कार्यालयांमध्ये जवळपास 12,828 ((महाराष्ट्र – 620 जागा)) रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.
भारतीय टपाल खात्याने दिलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार यासाठी 22 मे 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 11 जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तर 12 जून ते 14 जून 2023 दरम्यान उमेदवारांनी केलेल्या अर्जात दुरूस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे. (Post Office Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता –
या पदभरतीसाठी उमेदवार 10 वी पास असणे गरजेचे आहे. यामध्ये गणित आणि इंग्रजी अनिवार्य असावेत. तसेच उमेदवारास स्थानिक भाषेचे चांगले ज्ञान असावे.
GDS – Recruitment 2023
या पदभरतीतील ब्रॅंच पोस्ट मास्तर पदासाठी Rs.12,000-29,380 तर सहाय्यक ब्रॅंच पोस्ट मास्तर पदासाठी Rs.10,000-24,470 वेतन दिले जाणार आहे.
पदाची जबाबदारी आणि भूमिका
अ) शाखा पोस्ट ऑफिस (B.O) आणि भारतीय पोस्टचे दैनंदिन पोस्टल ऑपरेशन्स.
पेमेंट्स बँक (IPPB) पासून विभागाद्वारे वेळोवेळी विहित केलेल्या पद्धतीने प्रदान केल्या जाणार्या उत्पादनांचे आणि सेवांचे विपणन आणि प्रचार
विभाग आणि ग्राहक सेवा केंद्रांमध्ये विविध सेवा चालवणे
विभागाचे (सीएससी) इ. तसेच इतर नेमून दिलेली विविध कामे.
या पदभरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
Post Office GDS 2023 – GDS Recruitment 2023.pdf
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx