मुंबई | भारतीय टपाल विभाग अंतर्गत रिक्त पदाची मोठी भरती (Post Office Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 1899 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. यावर्षी पुन्हा एकदा टपाल खात्याने ही मेगाभरतीची घोषणा केली आहे.
Post Office Bharti 2023
या भरती अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
पोस्टल असिस्टंट | 598 पदे |
सॉर्टिंग असिस्टंट | 143 पदे |
पोस्टमन | 585 पदे |
मेल गार्ड | 03 पदे |
मल्टी टास्किंग स्टाफ | 570 पदे |
पदनिहाय शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोस्टल असिस्टंट | पदवी |
सॉर्टिंग असिस्टंट | पदवी |
पोस्टमन | 12वी |
मेल गार्ड | 12वी |
मल्टी टास्किंग स्टाफ | 10वी |
पदनिहाय वेतनश्रेणीचा तपशील
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पोस्टल असिस्टंट | Rs. 25,500 – 81,100/- |
सॉर्टिंग असिस्टंट | Rs. 25,500 – 81,100/- |
पोस्टमन | Rs. 21,700 – 69,100/- |
मेल गार्ड | Rs. 21,700 – 69,100/- |
मल्टी टास्किंग स्टाफ | Rs. 18,000 – 56,900/- |
PDF जाहिरात – Indian Postal Department Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply for Post Office Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
महत्वाच्या सूचना –
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.