नाशिक | विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र (Police Vidhi Adhikari Recruitment) अंतर्गत नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी
पदसंख्या – 34 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील.उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
विधी अधिकारी

पदाचे नाव
वेतनश्रेणी
विधी अधिकारी गट ब
विधी अधिकारी गट ब या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू.२५,०००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३,०००/- असे एकुण रू.२८०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत
विधी अधिकारी
विधी अधिकारी या पदाकरिता एकत्रीत अनुज्ञेय मासिक देय रक्कम रू. २००००/- + दुरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रू.३०००/- असे एकुण रू.२३,०००/- दरमहा देय राहील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.