News

Walmik Karad | वाल्मिक कराड अडचणीत; संतोष देशमुखांच्या हत्येशी थेट कनेक्शन असणारा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात सातत्याने वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव घेतले जात असले, तरी पोलिसांकडे त्याच्याविरोधात थेट पुरावे नव्हते. मात्र आता एसआयटीच्या तपासातून कराडविरोधात महत्त्वाचा पुरावा समोर आला असून तो लवकरच कोर्टात सादर केला जाणार आहे.

फोन संभाषणाचा तपासात खुलासा

सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याआधी दोन वेळा वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधला होता. यानंतर घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला होता. विशेष म्हणजे, या वादानंतरही घुलेने पुन्हा कराडशी संपर्क साधल्याचे तपासातून उघड झाले आहे.

आरोपींच्या कबुलीजबाबातून उघडकीस

याआधी आरोपी विष्णू चाटे याने आपल्या फोनवरून वाल्मिक कराडचे पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असल्याची कबुली दिली होती. आता सुदर्शन घुले प्रकरणातही कराडचे नाव समोर आल्याने पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे.

कोर्टात पुरावे सादर करण्याची तयारी

एसआयटीकडे मिळालेल्या पुराव्यांमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील नवे पुरावे कोर्टात सादर झाल्यानंतर प्रकरणाचा पुढील तपशील समोर येणार आहे.

Back to top button