मुंबई | पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ‘मुख्य जोखीम अधिकारी (CRO) आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)’ पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (PNB Recruitment 2023)
वरील रिक्त पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – पदवी, किंवा वित्त, व्यवसाय प्रशासन, संगणक यासारख्या संबंधित क्षेत्रात बॅचलर/ पदव्युत्तर पदवी, तसेच विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा उच्चस्तरीय संस्थेतून बी.टेक पदवी.
PDF जाहिरात – Punjab National Bank Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Punjab National Bank Application 2023
मुंबई | देशातील विविध नॅशनलाईज्ड बॅंकांमध्ये विविध पदांसाठी सातत्याने भरती होत असते. नुकतीच पंजाब नॅशनल बॅंकेनेही विविध रिक्त पदांच्या भरतीची (PNB Recruitment 2023) अधिकृत घोषणा केली आहे. या पदभरती अंतर्गत तब्बल 240 रिक्त जागांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 11 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
या पदभरती अंतर्गत अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. तर वयोमर्यादा अधिकारी पदासाठी 21 ते 30 वर्षे, व्यवस्थापक पदासाठी 25 ते 35 वर्षे आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 27 ते 38 वर्षे ठरवण्यात आली आहे. (PNB Recruitment 2023)
पदभरतीसाठी ठराविक शुल्क देखील आकारले जाणार आहे. यामध्ये SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी Rs 59/- तर इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी Rs 1180/- इतके अर्ज शुल्क आहे. निवड प्रक्रिया ऑनलाइन लेखी परीक्षा/वैयक्तिक मुलाखत याव्दारे केली जाणार आहे. वैयक्तिक मुलाखत 50 गुणांची असेल. मुलाखतीत किमान पात्रता गुण 45% म्हणजे SC/ST उमेदवारांसाठी 22.50 आणि इतर उमेदवारांसाठी 50% म्हणजेच 25 असावेत. (PNB Recruitment 2023)
उमेदवारांच्या पात्रतेचे समर्थन करणारी कागदपत्रे, सबमिट केलेल्या यशस्वी अर्जांच्या आधारे, योग्य टप्प्यावर गोळा केली जातील आणि केवळ तेच उमेदवार जे पात्र आढळले आहेत, संबंधित पदासाठी विहित केलेल्या पात्रता निकषांनुसार, कागदपत्रांच्या आधारावर वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
PDF जाहिरात | https://PNB/recruitment/pdf |
ऑनलाईन अर्जाची लिंक | https://PNB/recruitment/Application |
अधिकृत वेबसाईट | www.pnbindia.in |
