मुंबई | पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत ग्राहक सेवा सहयोगी (खेळाडू-पुरुष), कार्यालय सहाय्यक (खेळाडू-पुरुष) पदांची भरती (PNB Bharti 2025) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
पदाचे नाव – ग्राहक सेवा सहयोगी (खेळाडू-पुरुष), कार्यालय सहाय्यक (खेळाडू-पुरुष)
पदसंख्या – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (भरती विभाग), मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट कार्यालय, पहिला मजला, पश्चिम विंग, प्लॉट क्रमांक 4, सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली – 110075
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2025 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.