PMPML Bharti 2025: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) अंतर्गत कंत्राटी वाहक चालक पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत व पत्त्यावर हजर राहावे.
भरतीसाठी तपशील
- पदाचे नाव: कंत्राटी वाहक चालक
- शैक्षणिक पात्रता: SSC/HSC उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण: पुणे
- निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
- मुलाखतीची तारीख: १५ जानेवारी २०२५ ते २४ जानेवारी २०२५
- मुलाखतीचा पत्ता: शुभम सर्व्हिसेस, श्री कॅपिटल बिल्डींग, तिसरा मजला, लक्ष्मी कॉलनी, पुणे सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११०२८
- अधिकृत वेबसाईट: https://pmpml.org
आवश्यक कागदपत्रे
मुलाखतीला येताना उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- बॅच क्रमांक
- शाळा सोडल्याचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
- SSC/HSC प्रमाणपत्र
- अॅड्रेस पुरावा
- रहिवासी दाखला
- ट्रेनिंग सर्टिफिकेट
- पोलिस चारित्र पडताळणी दाखला
- वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
PDF जाहिरात | PMPML Walk in Interview 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://pmpml.org/ |
पीएमपी बससेवेच्या अडचणी
पीएमपीकडे पुरेशा बसेस व कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने प्रवाशांना वेळेवर सेवा मिळत नाही. कंत्राटी वाहक चालकांच्या या भरतीमुळे पीएमपीला वाहतूक सेवा सुधारण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, रिक्त पदे भरतीची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे.
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरएडीच्या हद्दीत दररोज ११ लाखांहून अधिक प्रवाशांची सेवा पुरवली जाते. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बस व कर्मचाऱ्यांची कमतरता गंभीर ठरत असून प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पीएमपीच्या आस्थापनेवर मंजूर १५,५१९ पदांपैकी फक्त ७,८५१ कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे, तर ७,८७० पदे रिक्त आहेत. यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण असून बससेवा वेळेवर व सुरळीत पुरवणे आव्हानात्मक ठरत आहे.
रिक्त पदांमुळे अडचणी
पीएमपीच्या विविध विभागांतील कर्मचारी व अधिकारी पदे रिक्त असल्याने सेवा व्यवस्थापन कोलमडले आहे. प्रशासन विभाग, वाहतूक विभाग व वर्कशॉप विभागांतील क्लार्क, असिस्टंट डेपो मॅनेजर, वायरमन, स्टेनो-टायपिस्ट व कॉम्प्युटर ऑपरेटर यांसारख्या पदांवरील रिक्तता गेल्या सहा वर्षांपासून कायम आहे.
विशेषतः क्लार्क पदाची ५१० जागांची आवश्यकता असून त्यातील ४८१ जागा रिक्त आहेत. २००७ नंतर या पदावर भरती झाली नसल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
बस व चालक-वाहकांचीही टंचाई
पीएमपीकडे सध्या ४,००० बस आवश्यक असताना रस्त्यावर फक्त निम्म्याच म्हणजे सुमारे २,००० बस उपलब्ध आहेत. यामध्ये पीएमपीच्या १,००३ बस आणि ठेकेदारांच्या ९२५ बस यांचा समावेश आहे. अपुरी बससेवा व वेळापत्रकातील विस्कळीतपणामुळे अनेक प्रवासी खासगी वाहनांकडे वळत आहेत.
सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना आवश्यक
रिक्त पदे तातडीने भरणे, नवीन बस खरेदी करणे व कार्यक्षमतेसाठी पायाभूत सुधारणा करणे यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रवाशांना होणारा त्रास व पीएमपीची कार्यक्षमता दोन्हीही कमी होण्याचा धोका आहे.