पुणे | केंद्र सरकारच्या अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत एक वर्षाच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यासाठी B.COM, M.SC व इतर पात्रता धारकांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी 3 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचे आहेत.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, द्विपक्षीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत, पदवीधरांना शिकण्याचा अनुभव मिळेल, तसेच नवीन ऊर्जा आणि कल्पना स्मार्ट सिटी आणि शहरी विकासासाठी मदत करतील. या पदभरती अंतर्गत एकूण 236 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
विधी, अभियांत्रिकी, पर्यावरण, संगणक विज्ञान, सामग्री, फलोत्पादन, जीवशास्त्र, बी.कॉम आणि शॉर्ट हँड टायपिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये इंटर्न नियुक्त केले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना 12 ते 15 हजार रूपये वेतन मिळणार आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित विषयाबाबत आणि पदाबाबत किमान माहिती असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – PMC TULIP Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – अर्ज करा