Govt. Scheme

आता 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळवा, असा करा \’या\’ योजनेसाठी अर्ज | PM Surya Ghar Yojna

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पीएम सूर्य घर मोफत वीज योजने (PM surya ghar yojna) बद्दल माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत आतापर्यंत 1.28 कोटी नोंदणी आणि 14 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर योजनेतून 300 यूनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. ही योजना काय आहे. याविषयी सविस्तर जाणून घेवूया. (How to apply for Surya Ghar Yojna )

काय आहे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना?

15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातू देशातील सुमारे 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत तुम्हाला सौर पॅनेल खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने घराच्या छतावर विजेसाठी सौर पॅनेल विकत घेतले तर सरकार 1 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 30,000 रुपये, 2 किलोवॅटच्या सौर पॅनेलवर 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट सौर पॅनेलवर जास्तीत जास्त 78,000 रुपये अनुदानाची रक्कम देते.

तुम्ही कसा घेऊ शकता फायदे?

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmsuryaghar.gov.in या अधिकृत पोर्टलवरून Apply For Rooftop Solar वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमचे राज्य निवडावे लागेल. याठिकाणी तुम्हाला वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. आता त्यात तुमचा मोबाईल आणि ग्राहक क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर मिळालेला ओटीपी टाकून कॅप्चा भरून सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचा रुफटॉप सोलरसाठी अर्ज सरकारकडे जमा होईल. ऑनलाइन अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, वीज बिल, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, फोटो, प्रतिज्ञापत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

दुसऱ्या टप्प्यात, ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगइन करावे लागेल, फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करावा लागेल.

तिसऱ्या टप्प्यात, जेव्हा तुम्हाला Feasibility Approval मंजूरी मिळेल, तेव्हा कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.

इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा. 

पुढील टप्प्यात, नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे पडताळणी केल्यानंतर, पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल. 

शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल.

Back to top button