News

कोल्‍हापूरः पी. एम. किसानची लिंक टाकून अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न; मोबाईल नंबर हॅक करून अकाउंट केले खाली! PM Kisan

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे मोबाईल नंबर हॅक करून हॅकर्सनी खात्यातील सर्व पैसे काढून घेतल्याची घटना घडली आहे. त्‍याचबरोबर हॅक केलेल्‍या नंबर वरून गावातील इतर व्हाट्सअप ग्रुपवर पीएम किसानची Apk लिंक शेअर करत अनेकांना गंडा घालण्याचाी प्रयत्न केला आहे. याबाबत सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी अंबप येथील एका नोकरदार महिलेचा मोबाईल नंबर हॅक करण्यात आला. नंबर हॅक केल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या गुगल पे वरून खात्यावरील सर्व रक्कम गायब करण्यात आली. यानंतर हॅक केलेल्या नंबरचा वापर करून गावातील वेगवेगळ्या व्यक्तींना तसेच व्हाट्सअप ग्रुपना पीएम किसानशी (PM Kisan) संबंधित लिंक टाकली.

ही लिंक ज्यांनी ज्यांनी ओपन केली त्यांच्याही खात्यावरून पैसे उडाल्याचे सांगण्यात येत आहे. पीएम किसानच्या Apk फाईलच्या माध्यमातून किती जणांचे खाते रिकामी झाले याची पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत प्रत्यक्ष तक्रार देण्यास कोणी समोर न आलेले नाही.

ज्यांनी ज्यांनी ही लिंक ओपन केली त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. संबधित नोकरदार महिलेचा मोबाईल नंबर हॅक झाल्याची तक्रार संबंधित महिलेच्या पतीने सायबर क्राईम विभागात नोंदवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Back to top button