PM Kisan योजनेचा 13वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार, जाणून घ्या अधिक माहिती

मुंबई | पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्याची प्रतिक्षा आता संपणार आहे. पीएम किसान योजनेचे पैसे केंद्र सरकारकडून 23 जानेवारी 2023 रोजी जारी केले जाऊ शकतात.

23 जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. हा दिवस सरकार शौर्य दिन म्हणून साजरा करते. त्यामुळे पीएम मोदी 23 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2,000 रुपये वर्च्यूल पध्दतीने एखाद्या कार्यक्रमात देऊ शकतात. ज्यांचा 12 वा हप्ता रखडला आहे त्यांचेही पैसे या हप्त्यासोबत मिळतील. 

13व्या हप्त्याचे पैसे 12व्या हप्त्याप्रमाणे अडकणार नाहीत, अशी भीती अनेक शेतकर्‍यांना असते, त्यामुळे अशा शेतकर्‍यांनी एकदा शेतकरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा ऑनलाइन कृषी पोर्टलवरून माहिती घ्यावी. केंद्र सरकारने यावेळी अपात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली असून, त्यांच्या खात्यात पैसे वर्ग होणार नाहीत.

PM Kisan च्या हप्ता इतकी ‘वाढ’ होणार? शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार पेक्षा जास्त रक्कम

केंद्र सरकारच्या येत्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेची (Pm Kisan Scheme) रक्कम वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार 2023 मध्ये किसान सन्मान योजनेच्या निधीत 2 हजार रूपयांची भर घालणार आहे. परंतु शासकीय पातळीवर याबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

केंद्र सरकरा 1 फेब्रुवारी रोजी आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 13 व्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने 2018 सालापासून पंतप्रधान किसान निधी योजना सूरू केली आहे. पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये जमा करते. तीन टप्प्याच्या अंतराने केंद्र सरकार 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते.

पीएम किसान योजनेसंदर्भात आवश्यक लिंक

PM-Kisan Samman Nidhi – अधिकृत वेबसाईट लिंक
Beneficiary Status
New Farmer Registration Form
Edit Aadhaar Failure Records
OTP Based Ekyc

पीएम किसान योजनेचा मुळ हेतू, शेतकऱ्यांना त्यांची शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यास हातभार लावणे हा आहे. बऱ्याचदा हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसतात, अशा वेळी ही रक्कम शेतकऱ्यांची कामी येईल अशी अपेक्षा सरकारला आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्यानी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.

ऑक्टोबर 2022 मध्ये PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तर जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात 13वा हप्ता जमा होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र अजूनही शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना 13व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.