Govt. Scheme

पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदीसाठी शासन देतयं अनुदान; इच्छुक महिलांना अर्ज करण्याचं आवाहन! Pink E Rickshaw Scheme

कोल्हापूर | रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदी करण्यास इच्छुक गरजू महिलांना पिंक गुलाबी ई-रिक्षा (Pink E Rickshaw Scheme) उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी इच्छुक महिलांनी पात्रतेनुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, कसबा बावडा, कोल्हापूर (फोन – 0231- 2661788) येथे अर्ज करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे.

महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांना अधिक स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबवण्यात येत आहे. या रिक्षा भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय ठरत आहेत. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारनेच हा उपक्रम हाती घेतला आहे.

पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना – स्वरुप आणि लाभार्थ्यांची पात्रता

  • लाभार्थी कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
  • विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • दारिद्रय रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल.
  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असलेल्या समितीकडून करण्यात येईल.
  • पात्र लाभार्थी ई-रिक्षा किंमतीच्या १० टक्के, राज्य शासन २० टक्के आणि बँक ७० टक्के कर्ज उपलब्ध करुन देईल.
  • कर्जाची परतफेड ५ वर्ष (६० महिने) आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.
Back to top button