Friday, March 24, 2023
HomeCareerपिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 32 रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 32 रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि कुठे करायचा अर्ज | PCMC Recruitment 2023

पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून (PCMC Recruitment 2023) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2023 आहे.

PCMC Recruitment 2023

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
 • पद संख्या – 32 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा –
  • प्राध्यापक
   • खुल्या प्रवर्गासाठी – 50 वर्षे
   • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 55 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक –
   • खुल्या प्रवर्गासाठी – 45 वर्षे
   • मागासवर्गीय प्रवर्गासाठी -50 वर्षे
  • सहायक प्राध्यापक
   • खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे
   • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे – 411018
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मार्च 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
 • भरती संदर्भ PDF जाहिरात – shorturl.at/qyCKQ
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापक१). परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत तीन वर्षांसाठी संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक.२). किमान चार संशोधन प्रकाशने (असोसिएट प्रोफेसर म्हणून किमान दोन) असणे आवश्यक आहे [केवळ ओरिजिनल आर्टीकल, मेटाअन्यालीसीस, सिस्टिम्याटिक रीविव आणि केस सेरीस जे मेडलाइन, पबमेड, सेंट्रल सायन्स सायटेशन इंडेक्स, सायन्स सायटेशन इंडेक्स, एक्सपांडेड एम्बेसेज, स्कोपस, ओपन एक्सिस जर्नल्स (DoAJ) अनुक्रमित जर्नल्समध्ये प्रकाशित केले गेले, असे विचारात घेतले जातील].३). एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.४ ). एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
सहयोगी प्राध्यापक१). परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत तीन वर्षांसाठी संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापक.२). किमान दोन संशोधन प्रकाशने असणे आवश्यक आहे [केवळ ओरिजिनल आर्टीकल, मेटाअन्यालीसीस, सिस्टिम्याटिक रीविव आणि केस सेरीस जे मेडलाइन, पबमेड, सेंट्रल सायन्स सायटेशन इंडेक्स, सायन्स सायटेशन इंडेक्स, एक्सपांडेड एम्बेसेज, स्कोपस, ओपन एक्सिस जर्नल्स (DoAJ) अनुक्रमित जर्नल्समध्ये प्रकाशित केले गेले, असे विचारात घेतले जातील].३). एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.४ ). एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
सहायक प्राध्यापकMD/MS/DNB पदवी संपादन केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून एक वर्ष.

PCMC Recruitment 2023

 1. शैक्षणीक अर्हता
 2. जातीचे प्रमाणपत्र 
 3. जात वैद्यता प्रमाणपत्र
 4. अनुभव प्रमाणपत्र
 5. पासपोर्ट साईज फोटो
 6. महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) अथवा केद्रीय वैद्यक परिषद
 7. (NMC) चे नोंदणी प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. प्रमाणपत्रे, फोटो
 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023 साठी निवड प्रक्रिया (PCMC Recruitment 2023)

 1. पदांसाठी निवड वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल.
 2. मुलाखतीसाठी उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंगसाठी, अधिक संबंधित अनुभव असलेल्यांचा प्रथम विचार केला जाईल.
 3. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणीक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र व जात वैद्यता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) अथवा केद्रीय वैद्यक परिषद (NMC) चे नोंदणी प्रमाणपत्र तसेच कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा. प्रमाणपत्रे, फोटो इत्यादी सादर करणे बंधनकारक आहे.
 4. मुलाखतीस येण्याजाण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular