परभणी | नोकरीच्या शोधात असणाऱ्या परभणी जिल्ह्यातील उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल 1570 रिक्त जागांसाठी येथे रोजगार मेळाव्याचे (Parbhani Job fair 2023) आयोजन करण्यात आले आहे. 14 जुलै रोजी हा रोजगार मेळावा पार पडणार आहे.
Parbhani Job fair 2023 – या रोजगार मेळाव्याअंतर्गत ‘विमा सल्लागार, सुरक्षा रक्षक, संबंध व्यवस्थापक / फील्ड सेल्स / CNC मशीन, प्रशिक्षणार्थी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, लेखापाल, कृषी अधिकारी आणि इतर’ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वरील रिक्त पदांसाठी 8वी ते बीई पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी, आणि खाली दिलेल्या पत्यावर रोजगार मेळाव्या करिता 14 जुलै 2023 रोजी हजर राहावे.
PDF जाहिरात – Parbhani Job fair 2023
रिक्त पदांचा तपशील – Parbhani District Job Fair 2023
नोंदणी करण्यासाठी लिंक – Register Here