Tuesday, September 26, 2023
HomeCareerपरभणी येथे 10 वी, ITI ते पदवीधरांना नोकरीची संधी, 530 रिक्त जागांसाठी...

परभणी येथे 10 वी, ITI ते पदवीधरांना नोकरीची संधी, 530 रिक्त जागांसाठी भरती | Parbhani Job Fair 2023

परभणी | परभणी येथे विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. खाली दिलेल्या पत्त्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.

याठिकाणी, ‘पिकर आणि पॅकर, वायर हार्नेस, सुरक्षा रक्षक, प्रशिक्षणार्थी EPP, रक्षा सुरक्षा दल, प्रशिक्षणार्थी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, एलआयसी एजंट/विमा सल्लागार, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’ जागांची भरती केली जाणार आहे. 

शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate/ ITI (Read Complete Details)

जिल्हयातील सुशिक्षीत बेराजगार युवक युवतींसाठी या अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त महाराष्ट्र शासनाव्दारे दि. 27/08/2023 रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा श्री मंगलकार्यालय, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ स्टेशन रोड, परभणी येथे आयोजीत केला आहे.

परभणी जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्हयातील गरजू बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास 30 नामांकित मोठे उद्योजक / कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत.

PDF जाहिरात Parbhani Job fair 2023
नोंदणी कराJob Fair Registration

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular