Sunday, September 24, 2023
HomeCareerपाचोरा सहकारी शिक्षण संस्था अंतर्गत 83 रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित | Pachora...

पाचोरा सहकारी शिक्षण संस्था अंतर्गत 83 रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित | Pachora Shikshan Sanstha Bharti

जळगाव | नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून अनेक शिक्षण संस्थांमध्ये सध्या विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जात आहे. पाचोरा सहकारी शिक्षण संस्था मर्यादित अंतर्गत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे देखील विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. (Pachora Shikshan Sanstha Bharti)

पाचोरा सहकारी शिक्षण संस्था अंतर्गत या महाविद्यालयात “सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 जुलै 2023 आहे. (Pachora Shikshan Sanstha Bharti)

सदर पदांच्या मुलाखतीसाठी मा. अध्यक्ष, पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था लि. पाचोरा श्री. श्री मा. साहित्य व वाणिज्य महाविद्यालय भडगाव रोड पाचोरा जि. जळगाव-424201 या पत्यावर उपस्थित राहावे. वेळापत्रकानुसार वॉक-इन-इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वरील तारखेला, वेळ आणि ठिकाणी थेट मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. (Pachora Shikshan Sanstha Bharti)

PDF जाहिरात – https://shorturl.at/kwOR5
अधिकृत वेबसाईटwww.ssmmcollege.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular