Sunday, September 24, 2023
HomeCareerपदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत भरती | NTRO...

पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत भरती | NTRO Jobs 2023

मुंबई | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था येथे ‘उपसंचालक, सहाय्यक संचालक‘ पदाच्या रिक्त जागा भरण्यात (NTRO Jobs 2023) येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2023  आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असून उमेदवारांनी आपले अर्ज उपसंचालक (आर), नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, ब्लॉक-III, ओल्ड जेएनयू कॅम्पस, नवी दिल्ली – 110067 या पत्त्यावर पाठवावेत.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचा फॉर्म (A-4 आकाराच्या कागदावर) फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करून इंग्रजी कॅपिटल (ब्लॉक) अक्षरांमध्ये भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

PDF जाहिरातNational Technical Research Organisation Jobs 2023
PDF जाहिरात IINTRO Jobs 2023
अधिकृत वेबसाईट – ntro.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular