Career

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 284 पदांसाठी भरती; अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 | NPCIL Bharti 2025

मुंबई | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे एकूण 284 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 आहे.


रिक्त पदांचा तपशील: NPCIL Bharti 2025

पदाचे नावपदसंख्या
ट्रेड अप्रेंटिस176
डिप्लोमा ॲप्रेंटिस32
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस76

शैक्षणिक पात्रता:

  • ट्रेड अप्रेंटिस: संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण.
  • डिप्लोमा ॲप्रेंटिस: संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा.
  • ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस: संबंधित क्षेत्रातील B.E./B.Tech.

महत्त्वाची माहिती:

  • वयोमर्यादा: 18 ते 26 वर्षे.
  • अर्ज पद्धती: ऑफलाइन.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता:
    डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, काक्रापार, गुजरात साइट, अनुमाला – 394651,
    ता. व्यारा, जि. तापी, गुजरात.
  • अधिकृत वेबसाईट: https://npcil.nic.in

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. उमेदवारांनी अर्ज संबंधित पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावा.
  2. अर्ज सादर करण्याआधी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत.
  4. अंतिम तारीख नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  5. अधिक माहितीसाठी आणि मूळ जाहिरात वाचण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
PDF जाहिरातNPCIL Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://npcil.nic.in/
Back to top button