मुंबई | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NMMC Recruitment 2023) केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया निव्वळ कंत्राटी तत्वावर करावयाची आहे.
वैद्यकिय अधिकारी वैद्यकिय महाविद्यालय या पदाकरिता Walk in Interview (थेट मुलाखत) दि. 21/08/2023 रोजी घेण्यात येतील व वरिष्ठ टीबी प्रयोगशाळा पर्यवेक्षक व टी.बी. हेल्थ व्हीजीटर या पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. 1. से. 15ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे दि.27/07/2023 ते दि. 21/08/2023 पर्यंत सादर करावेत.
PDF जाहिरात – Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2023
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेसाठी (Post Graduate Institute) walkin Interview (थेट मुलाखत) द्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरीष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने मासिक एकत्रित मानधन तत्वावर 06 महिन्याच्या कालावधी करिता भरावयाची आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामार्फत तांत्रिक कागदपत्रांची तपासणी करुन उमेदवारांच्या मुलाखती (Walk in Interview ) घेण्यात येतील. सदर उमेदवारांची मुलाखत ही वरील समिती मार्फत प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी घेण्यात येईल.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका
PDF जाहिरात – NMMC Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in