Tuesday, September 26, 2023
HomeCareerनागपूर महानगरपालिकेत 853 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू होणार, तयारीला लागा | NMC...

नागपूर महानगरपालिकेत 853 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू होणार, तयारीला लागा | NMC Recruitment 2023

नागपूर | राज्य शासनाने महापालिकेत 853 जागांच्या पदभरतीला (NMC Recruitment 2023) मंजुरी दिली आहे. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून प्रक्रिया सुरू होणार असून, दोन टप्प्यात भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागाची 350 पदे भरण्यात येणार आहेत.

महापालिकेत सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी ही पदे वर्ग 1 श्रेणीत येतात. या पदांची भरती यापूर्वी एमपीएससीद्वारे केली जायची. परंतु आता महापालिकेलाच या पदांच्या भरतीचे अधिकार नगरविकास विभागाने दिले आहेत.

मागील बारा वर्षांपासून महानगरपालिकेत पदभरती झालेली नाही. दर महिन्याला सुमारे 50 अधिकारी कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे मनुष्यबळाअभावी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. राज्य शासनाने महानगरपालिकेच्या 17981 पदांच्या एकत्रित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. त्यानुसार महानगरपालिकेत 853 पदांची भरती होणार आहे.

विशेष म्हणजे सहायक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी हे वर्ग 1 श्रेणीत येत असून, ही पदे भरण्याचे अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आहेत. ही पदे भरण्यासंदर्भात महानगरपालिकेने नगरविकास विभागाला मार्गदर्शन मागविले होते. शासनाने ही पदे भरण्यास मनपाला मंजुरी दिली आहे. शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे ‘टीसीएस मार्फत वैद्यकीय विभागाची पदे भरली जाणार आहेत.

महापालिका व TCS मध्ये तसा करार करण्यात आला आहे. महानगरपालिकेतील ‘ब’ व ‘ड’ संवर्गातील 853 पदे टीसीएसमार्फत भरता येणे शक्य आहे. मात्र डॉक्टरांची पदे ‘अ’ संवर्गात येतात. ती पदे एमपीएससीमार्फतच भरावी लागत असल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र सहायक आयुक्त व डॉक्टर ‘अ’ संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून परवानगी मिळाली असल्याचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन यांनी सांगितले.


नागपूर | नागपूर महानगरपालिका आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य, नागपुर अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदांच्या रिक्त जागांसाठी नोकरीची संधी आहे.

स्टाफ नर्स पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी GNM, B.Sc Nursing ही पात्रता असून, पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग पाचवा माळा. छत्रपती शिवाजी महाराज, नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-440001

अर्जाचा नमुना आणि भरतीविषयी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे.

PDF जाहिरातNHM Nagpur Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in


नागपूर | आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (NMC Recruitment 2023) केली जाणार आहे. कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर.
नोंदणीची व मुलाखतीची वेळ : सकाळी 11 ते 2 वाजता

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही याची नोंद घ्यावी.

PDF जाहिरात – NMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटwww.nmcnagpur.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular