Tuesday, September 26, 2023
HomeCareerनेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 293 रिक्त जागांसाठी भरती; संधी चुकवू नका |...

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांच्या 293 रिक्त जागांसाठी भरती; संधी चुकवू नका | NLC Recruitment 2023

मुंबई | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती (NLC Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.

या पदभरती अंतर्गत एकूण 293 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) पदाच्या 223 जागा, डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade) पदाच्या 32, मॅनेजर (E4 Grade) पदाच्या 16 जागा, असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade) पदाच्या 06 जागा, ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade) पदाच्या 08 जागा, जनरल मॅनेजर (E8 Grade) पदाच्या 02 जागा, तर डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) पदाच्या 06 जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : NLC Recruitment 2023
एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade)

(i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/पर्यावरणविषयक इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य.
(ii) 05 वर्षे अनुभव

डेप्युटी जनरल मॅनेजर (E7 Grade)
(i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिरिंग पदवी/CA
(ii) 19 वर्षे अनुभव

मॅनेजर (E4 Grade)
(i) M.Tech./M.Sc. (जिओलॉजी)
(ii) 05 वर्षे अनुभव

असिस्टंट एक्झिक्युटिव मॅनेजर (E2 Grade)
(i) M.Sc. (केमिस्ट्री/ॲनलिटिक्स केमिस्ट्री/आर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री)
(ii) 04 वर्षे अनुभव

ॲडिशनल चीफ मॅनेजर (E6 Grade)
(i) CA/ICWAI/ICMAI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA
(ii) 13 वर्षे अनुभव

जनरल मॅनेजर (E8 Grade)
i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी किंवा CA/ICWA.
(ii) 22 वर्षे अनुभव

डेप्युटी मॅनेजर (E3 Grade)
(i) कोणत्याही शाखेतील पदवी आणि
(ii) कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यामधील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कार्मिक व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / औद्योगिक संबंध / एचआरएम / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास.
(iii) 01 वर्ष अनुभव

या पदभरतीसाठी वयोमर्यादा 01 जून 2023 रोजी 32 ते 54 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) आहे. तर परिक्षा फी जनरल/ओबीसी/ 854/- रुपये (SC/ST/PWD/ExSM: ₹354/-) इतकी आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2023 (11:45 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.nlcindia.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular