मुंबई | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 16 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात असून ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी‘ ही पदे भरण्यात येणार आहेत.
ही पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. (NIDM Bharti 2023)
इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज कार्यकारी संचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, (NIDM), (गृह मंत्रालय), भूखंड क्र. 15, पॉकेट-3, ब्लॉक-बी, सेक्टर-29, रोहिणी, दिल्ली-110042 या पत्यावर पाठवावेत. (NIDM Bharti 2023)
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे/माहिती सोबत नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी nidm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
PDF जाहिरात – National Institute of Disaster Management Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – nidm.gov.in