सोलापूर | राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर येथे विविध रिक्त पदांकरिता भरती (NHM Solapur Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील 14 संवर्गातील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत, एकुण 52 रिक्त जागांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. सदरील पदे ही कंत्राटी स्वरुपाची आणि करार तत्वावरील एकत्रित मानधनावरील आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ते 27 सप्टेंबर 2023 आहे.
पदाचे नाव – सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, तंत्रज्ञ, श्रवण प्रशिक्षक, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, तालुका गट व्यवस्थापक, आशा समूह प्रवर्तक
अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थाप राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांकडून दिनांक 18/09/2023 ते दिनांक 27/9/2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
PDF जाहिरात – National Health Mission Solapur Recruiutment 2023
अधिकृत वेबसाईट – zpsolapur.gov.in