Sunday, September 24, 2023
HomeCareerNHM महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या 340 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज...

NHM महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या 340 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | NHM Recruitment 2023

मुंबई | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांची मोठ्या प्रमाणात भरती (NHM Maharashtra Recruitment 2023) केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार एकूण 340 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदभरतीची जाहिरात www.arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधारण सुचना/माहिती येथे दिलेली आहे. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून ऑनलाईन अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच सादर करावा. अर्ज करण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे. (NHM Maharashtra Recruitment 2023)

पदांचा तपशील – राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक आरोग्य सल्लागार, राज्य लेखा आणि वित्त व्यवस्थापक, गैर-वैद्यकीय सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि इतर

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://nhmrecruitment.maha-arogya.com/ या लिंक वरून अर्ज करू शकतात. देय तारखेला प्राप्त झालेले अपूर्ण/चुकीचे ऑनलाइन अर्ज नाकारले जातील. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरातNHM Maharashtra Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा Apply For NHM Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular