पुणे | जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (NHM Pune Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण 28 जागा भरण्यात येणार आहेत.
या पदभरती अंतर्गत – ‘वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल अधिकारी, सहाय्यक मेट्रन, नर्सिंग स्टाफ (स्त्री), नर्सिंग स्टाफ (पुरुष), पंचकर्म टेक्निशियन (स्त्री),पंचकर्म टेक्निशियन (पुरुष), योगा इन्स्ट्रक्टर, औषध निर्माण अधिकारी / वितरक, लॅब टेक्निशियन, भांडारपाल / क्लर्क, नोंदणी क्लर्क’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, पुणे.
PDF जाहिरात – NHM Pune Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.zppune.org