उस्मानाबाद | जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानसाठी विविध प्रकारच्या 43 रिक्त जागांची भरती (NHM Osmanabad Bharti 2023 ) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. (NHM Jobs)
या पदभरती अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, विशेषज्ञ’ पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2023 आहे.
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रम नं. २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.
- मुलाखतीची तारीख – 19 जुलै 2023
- PDF जाहिरात – NHM Osmanabad Recruitment 2023
- अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in