NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 07 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
भरतीसाठी पदे आणि संख्या – NHM Nashik Bharti 2025
- जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP) – 1
- फिजिओथेरपिस्ट – 1
- EMS समन्वयक – 1
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ) – 1
- ऑडिओलॉजिस्ट – 2
- पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) – 1
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. खाली काही प्रमुख अटी दिल्या आहेत:
- जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP) – वैद्यकीय पदवीधर (Any Medical Graduate).
- फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपीतील पदवी व किमान 2 वर्षांचा अनुभव.
- EMS समन्वयक – समाजशास्त्रात एमएसडब्ल्यू किंवा एमए पदवी.
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ) – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी निरीक्षक कोर्स, तसेच संगणक कौशल्य आणि दुचाकी वाहन परवाना.
- ऑडिओलॉजिस्ट – ऑडिओलॉजीतील पदवी.
- पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) – 12वी उत्तीर्ण व 4 महिन्यांचा कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रशिक्षण प्रमाणपत्र.
वेतनश्रेणी
- जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP) – ₹35,000/- प्रति महिना
- फिजिओथेरपिस्ट – ₹20,000/- प्रति महिना
- EMS समन्वयक – ₹20,000/- प्रति महिना
- वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (ΝΤΕΡ) – ₹20,000/- प्रति महिना
- ऑडिओलॉजिस्ट – ₹25,000/- प्रति महिना
- पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) – ₹17,000/- प्रति महिना
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक या पत्यावर पाठवावेत. अर्ज पाठवण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025
अधिक माहिती
भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी zpnashik.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
PDF जाहिरात | NHM Nashik Bharti Advt. 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://zpnashik.maharashtra.gov.in/ |