Thursday, June 8, 2023
HomeNewsSharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीनं शरद पवारांचा राजीनामा फेटाळला, पवारांनी...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीनं शरद पवारांचा राजीनामा फेटाळला, पवारांनी घेतली नवी भूमिका

मुंबई | राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीनं शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा फेटाळला आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर पवार यांनीही विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मागील 4 दिवसांपासून राष्ट्रवादी मध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. आज पुन्हा एकदा मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नेत्यांसोबत या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पण, यावर अनेक मान्यवरांनी आपला भावना व्यक्त करून शरद पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. आजच्या बैठकीत त्याबद्दल आम्ही प्रस्ताव मांडला आणि सगळ्यांनी पवार यांना राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली, असं पटेल यांनी सांगितले.

दरम्यान, आजच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवारांचा राजीनामा अध्यक्ष निवडी समितीने एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांचा राजीनामा हा आमच्यासाठी धक्का होता त्यांची पक्षाला गरज असून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती समितीमधील नेत्यांनी केली. शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं, अशी विनंती या समितीनं केली आहे.

समितीमध्ये केलेला हा ठराव शरद पवारांना पाठवण्यात येणार आहे. यानंतर शरद पवार या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आता शरद पवार समिती आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन राजीनामा मागे घेतात की आपल्या राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम राहतात हे पाहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular