Sunday, September 24, 2023
HomeNewsअखेर शरद पवारांनी मान्य केलं.. अजित पवार आमचेच नेते, राजकीय वर्तुळात खळबळ!

अखेर शरद पवारांनी मान्य केलं.. अजित पवार आमचेच नेते, राजकीय वर्तुळात खळबळ!

बारामती | राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर कालपर्यंत अजित पवार यांच्या गटाविरोधात दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणाला कटालणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शरद पवारांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या वक्तव्याने शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही दादा आमचेच नेते आहेत असे वक्तव्य केले होते. याबाबत माध्यमांनी पवार यांना छेडले असता सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले. ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या संस्थांनी केलेले निवडणूक सर्वे याबाबत मला काही माहिती नाही. मात्र आम्ही ज्या संस्थांची वा संघटनांशी बोलतो आहोत त्यामधून महाविकास आघाडीला राज्यांमध्ये चांगल्या जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular