मुंबई | पदवीधर उमेदवारांसाठी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये (NCL Recruitment 2023) शिकाऊ उमेदवारीसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. येथे 700 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून अधिक माहितीसाठी ही अधिसूचना खाली दिलेल्या लिंकवर पहा.
NCL Recruitment 2023 – या पदांसाठी अर्ज करण्याची पात्रता आणि इच्छूक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. अर्जाची नोंदणी लिंक अद्याप उघडलेली नसून, नोंदणी लिंक 20 जुलै 2023 रोजी उघडेल. रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे.
रिक्त जागांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश प्रदेशासाठी पदवीधर आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदाच्या 700 जागा भरल्या जातील. यामध्ये BA, B.com, BCA, B.Pharma, इंजिनियरिंग आणि डिप्लोमा पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
NCL Recruitment 2023 Notification (Click)
कोण अर्ज करू शकतात
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच BE, B.Tech किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांनी आपली पदवी मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेली असावी. 18 ते 26 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. विशेष श्रेणीला नियमानुसार वयात सवलत मिळेल.
वरील रिक्त पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडची अधिकृत वेबसाइट nclcil.in वर जावे लागेल.
निवड प्रक्रिया कशी आहे?
या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.