नवी मुंबई | शासनाने राज्यातील दहा पोलिस आयुक्तालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचाही समावेश आहे. आयुक्तालयासाठी 5256 पदे मंजूर केली असून, 35 पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे. (Navi Mumbai Police Bharti 2023)
Navi Mumbai Police Bharti 2023 – ठाणे आयुक्तालयाचा भाग असलेल्या नवी मुंबईसाठी 1994 मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय तयार करण्यात आले आहे. या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल व उरण तालुका यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र 953 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये 144 किलोमीटर सागरी किनाऱ्याचा समावेश असून, 20 पोलिस ठाण्यांत ते विभागले आहे. याशिवाय गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, अमानवी वाहतूक विरोधी कक्षासह इतर शाखाही आहेत.
आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तपशील
आयुक्त – 1, सहपोलिस आयुक्त – 1, अपर पोलिस आयुक्त – 1, पोलिस उपायुक्त – 6, पोलिस अधीक्षक – 1, उपअधीक्षक – 2, सहायक आयुक्त – 11, निरीक्षक – 86, राखीव निरीक्षक – 1, सहायक पोलिस निरीक्षक – 202, उपनिरीक्षक – 241, राखीव उपनिरीक्षक – 2, सहायक पोलिस उपनिरीक्षक – 281, हवालदार – 1488, शिपाई – 2737, उपनिरीक्षक चालक – 1, हवालदार चालक – 4, शिपाई चालक – 113, प्रशासकीय अधिकारी – 1, स्वीय सहायक – 1, उच्चश्रेणी लघुलेखक – 2, निम्नश्रेणी लघुलेखक – 2, कार्यालय अधीक्षक – 1, लेखा अधिकारी 1, सहायक लेखा अधिकारी 1, स्थापत्य अभियंता 1, प्रमुख लिपिक 8, वरिष्ठ श्रेणी लिपिक 15, कनिष्ठ श्रेणी लिपिक 44 अशा पदांचा समावेश आहे.
बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार पदे
कार्यालयीन शिपाई – 15, मेस मॅनेजर 1, सफाई कामगार 14, शिंपी 1, मुख्य आचारी 1, सहायक आचारी 1, भोजनालय सेवक 1, मेस सर्व्हंट 1.
शहरातील पोलिस स्टेशन पुढीलप्रमाणे
वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, सानपाडा, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका, उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी.