Saturday, September 23, 2023
HomeCareerनाशिक महापालिका अंतर्गत 2 हजार 700 रिक्त जागांची भरती, लवकरच जाहिरात येणार...

नाशिक महापालिका अंतर्गत 2 हजार 700 रिक्त जागांची भरती, लवकरच जाहिरात येणार | Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

नाशिक | महानगरपालिकेत लवकरच 49 विभाग त्यांचा आकृतिबंध महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना सादर करणार आहेत. दरम्यान कोणत्या विभागासाठी कोणती शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या 2 हजार 700 पदांच्या नोकर भरतीला प्रारंभ होणार आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. 

महापालिकेत मागील तब्बल चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. याचा मोठा फटका पालिकेच्या कामकाजावर होतो आहे. नोकर भरतीसाठीचे काम टीसीएस कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून प्रारंभी आरोग्य, अग्निशमन या विभागातील 706 पदांसाठी भरती करणार आहे. ही भरती झाल्यानंतर उर्वरीत पदांकरिता नोकर भरती होइल. 

यापूर्वी महानगरपालिकेने भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे 14 हजार रिक्त जागांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला होता. परंतु महापालिकेने पाठविलेल्या आकृतीबंधात अनेक त्रुटी आढळल्या. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यावर पालिकेवर ताण वाढेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे शासनाने हा आकृतीबंध पुन्हा महापालिकेला पाठवत त्रुटी दूर करुन नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अंतिम आकृतीबंध तयार करुन तो आयुक्तांना सादर करुन शासनाच्या नगररचना विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल.

दरम्यान महापालिकेची हद्द दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरवासियांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. महानगरपालिकेच्या जवळपास साडे सात हजार कर्मचाऱ्यांपैकी आज मितीस तीन ते चार हजारांच्या आसपास कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिककरांना उपलब्ध मनुष्यबळात सोयीसुविधा देताना महापालिकेवरील ताण वाढला आहे. कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने दिसत आहे.


Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

नाशिक महापालिकेत भरती, 40 हजार पगाराची संधी चुकवू नका | Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

नाशिक | नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Nashik Mahanagarpalika Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याठिकाणी पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरिल रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 25 ते 40 हजार महिना पगार दिला जाईल.

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील, नोटीस बोर्ड मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, नोटीस बोर्ड, मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक येथे लावण्यात येईल. मुलाखतीतस पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही. अर्ज छाननी अंती पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ निवृत्ती झाल्याचा दाखला/पत्रा सह उपस्थितीत रहावे.

PDF जाहिरातNashik Municipal Corporation Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://nmc.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular