नागपूर | नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांसाठी तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकरिता शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 ते 21 जुलै 2023 दरम्यान थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे. (Nagpur Municipal Corporation Recruitment 2023)
ही पदभरती माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात निश्चित मानधनावर आहे. “शिक्षक” पदांच्या 83 रिक्त जागा भरण्यासाठी ही तात्पुरती पदभरती असून शालेय सत्र 2023-24 मध्ये 19 महिन्यांच्या कालावधीकरिता आहे. यासाठी प्रत्यक्ष मुलाखतोव्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी सर्व संबंधितांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह नमूद वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहावे. (Nagpur Municipal Corporation Recruitment 2023)
मुलाखतीचा पत्ता – शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.
शैक्षणिक पात्रता – B.Sc, BA, MA, B.Ed
PDF जाहिरात – NMC Nagpur Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in